आरोग्य सेतू ॲप कुणी बनवलं, जाणून घ्या

नवी दिल्ली – कोरोना संकटामध्ये कोरोना रुग्ण आणि कोरोना हॉटस्पॉट या भागांची माहिती नागरिकांना मिळून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी मदत होईल आणि नागरिकांना सावधानता बाळगायला साठी आरोग्य सेतू ॲप बनवण्यात आला होत. देशातील कोट्यवधी लोकांकडून वापरात असलेलं आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरकारकडून यांनी जनतेला आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास प्रोत्साहन दिलेलं ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अॅप नेमकं बनवलं कुणी? असा प्रश्न केंद्रीय सूचना आयोगानं मंगळवारी उपस्थित केला होता.

कोट्यवधी लोकांची माहिती गोळा करणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲपबद्दल टाकण्यात आलेल्या आरटीआयच्या अर्जाचं स्पष्टपणे उत्तर का देण्यात आलेलं नाही? असा प्रश्नही केंद्रीय सूचना आयोगानं विचारला होता.

दरम्यान, आता कोविड १९ च्या साथीशी लढा देण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, या उद्देशानं सरकारनं सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून आरोग्य सेतू ॲपसुरू केल्याचा खुलासा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं केला आहे.

आरोग्य सेतू ॲपबाबत माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगानं सरकारकडं खुलाशाची मागणी केली होती, त्याला उत्तर देताना इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

या अॅपच्या निर्मितीत सहभागी असणाऱ्याची नावं हे ॲप सर्वांसाठी खुलं करतानाचा जाहीर करण्यात आली होती, अत्यंत पारदर्शक पद्धतीनं याचं काम झालं असून, आरोग्य सेतू पोर्टलवर सर्व माहिती देण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –