कोरोनाबाधित रुग्णांसाठी दुधी भोपळा खाणे का फायद्याचे आहे, घ्या जाणून…..

दुधी भोपळा

दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. तसेच दुधी भोपळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आता सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या विषाणूमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये अगोदर व्याधी असलेल्या लोकांचे प्रमाण देखील भरपूर आहे. हल्ली कोविड-१९ रुग्णांसाठी रक्तदाबाचा त्रास हा धोका ठरत आहे. त्याचप्रमाणे मधुमेह असणाऱ्यांसाठी देखील हा धोका ठरत आहे. पण दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास उच्चरक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व संभाव्य धोक्यापासून आपण दूर राहू शकतो.

दुधी भोपळा खाण्यामुळे आपल्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइड्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल आटोक्यात राहिल्याने हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात यासारखे गंभीर आजार दूर राहण्यास मदत होते. तसेच यात पोटॅशियमचे प्रमाणही मुबलक असल्याने ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो. पर्यायाने हृदय निरोगी ठेवण्यासाठी दुधी भोपळा उपयोगी असतो. जर आपण नियमितपणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपली उच्चरक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

तसेच भोपळा पित्तनाशक असून डोके दुखत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात मध घालून प्यायला हवा. ताप आल्यानंतर दुधी भोपळ्याचे सूप पिणे गुणकारी ठरते. ताप वाढत असल्यास दुधी भोपळ्याचा कीस कपाळी लावल्यास फायदा होतो. शांत झोपेसाठीही दुधी भोपळ्याचे तेल डोके व तळव्यांना लावल्यास आराम मिळतो. तसेच दुधी भोपळ्यात विषनाशक गुण असतात.

तसेच भोपळ्याच्या रसात अधिक मात्रेत पाणी असते, ते शरीर थंड ठेवते. रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिल्यास पचनक्षमता वाढण्यास मदत होते. दुधी भोपळ्यात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय दुधी भोपळा इन्सुलिन वाढविण्यासही मदत करतो. अशाप्रकारे दुधी भोपळा मधुमेहामध्ये उपयुक्त ठरतो.

महत्वाच्या बातम्या –