Googleवर नंबर शोधणं पडलं महागात ; मोजावे लागले तब्बल एक लाख रुपये !

Googleवर नंबर शोधणं पडलं महागात ; मोजावे लागले तब्बल एक लाख रुपये ! google

आजकाल मोबाईलमुळे सर्व गोष्टी फक्त एका क्लीकवर आपल्याला उपब्लध होतात. खाणे,पिणे इत्यादी दैनंदन जीवनातील गोष्टी आपण मोबाईलवरून मागवत असतो. बाहेर जायचा कंटाळा आला कि आपण घरीच एखाद्या हॉटेलमधून ऑर्डर मागवतो. मात्र गुगलवरून नंबर घेऊन एखादी ऑर्डर  किती महागात पडू शकत याचा वाईट अनुभव गिरगावातील एक व्यक्तीला आला .

जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……

या व्यक्तीने एका फेमस हॉटेलमधील  थाळी मागविण्यासाठी गुगलवरून नंबर शोधून त्यावर कॉल केला. ऑर्डर घेताना या हॉटेल वाल्याने कॅश ऑन डिलिव्हरीसाठी नकार दिला आणि त्याऐवजी आपण दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लीक करा आणि ऑर्डरचे बिल भरा असे सांगितले.त्याच्या म्हणण्यानुसार या माणसाने त्याला आलेल्या लिंकवर क्लिक करून पैसे भरले. नंतर आपलं नेटबँकिंग सुरू करून आपला ID आणि पासवर्ड अपलोड केला मात्र OTP येत नव्हता. त्यामुळे पैसे खात्यातून गेल्याचं समजत नव्हतं. म्हणून व्यापाऱ्यानं पुन्हा एकदा ऑर्डर घेणाऱ्याला फोन केला. त्यावेळी समोरच्या माणसानं सांगितलं मोबाईल रिस्टार्ट करा म्हणजे OTP येईल. व्यापाऱ्यानं मोबाईल रिस्टार्ट केला आणि त्याचा प्रॉब्लेम सुटण्यापेक्षा अधिक गुंता झाला. त्याला आपल्या अकाऊंटमधून पैसे जात असल्याचं दिसत होतं. मात्र काहीच करू शकला नाही.

जाणून घ्या, काय आहेत गाजराचे फायदे….

हा प्रकार घडल्यानंतर याने लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत तक्रार नोंदवली. सध्या मोबाईलमधील sms आणि फोन यांच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरू आहे.