घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत

पाच ब्रास वाळू

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.

जिल्हाधिकाºयांनी दिलेले आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्याकडे दिले आहेत. त्याप्रमाणे प्रधानमंत्री, रमाई, शबरी पारधी आवास योजनेतील जिल्ह्यातील ५९५ गावातील ५०३४ लाभार्थ्यांना २० हजार ५८३ ब्रास वाळू वाटपाचे पास वितरित करण्यात येत आहेत.

अक्कलकोट तालुक्यात तडवळ येथे महसूल विभागाने चोरटी वाहतूक करणारी ६०० ब्रास वाळू जप्त केली होती. ही वाळू २१५ लाभार्थ्यांना तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी, सहायक महादेव बेळ्ळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली. गटविकास अधिकारी कोळी यांनी वाहनांची उपलब्धता करीत लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ही वाळू पोहोच केली.

महत्वाच्या बातम्या –

‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पाच कोटी एकसष्ट लाख शेतकऱ्यांना विमासंरक्षण’

जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल – देवेंद्र फडणवीस

राजीनाम्यानंतरही काँग्रेसमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतं आहेत राहुल गांधी?

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.