पवना धरणातून पाणी साेडल्याने पवना नदीला पूर

पवना नदीला पूर

पवना धरणातून सोडण्यात आलेले पाणी व मावळात पडत असलेला मुसळधार पाऊस  कोसळत असल्याने किवळे, मामुर्डी , गहुंजे व सांगवडे परिसरात पवना नदीला पूर आला आहे. धामणेतील पूलासह  गहूंजे-साळुंब्रे , मामुर्डी-सांगवडे हे दोन्ही  साकव पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

धामणे, सांगवडे व गहूंजेसह महापालिकेच्या मामुर्डी व किवळेतील स्मशानभूमी, निवारा शेड पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान जोरदार पावसाने भात खाचरात व शेतात पवना नदीचच्या पुराचे पाणी शिरल्याने  किवळे व गहुंजे परिसरातील काही शेतकऱ्याची भात खाचरे पाण्याने फुल्ल झाली आहेत.

काही वाहून गेली आहेत.भात खाचरांचे  मोठे नुकसान झाले आहे. किवळेत आंब्याच्या बागेसह एक फार्म हाऊस , परिसरातील भात खाचरात  नदीचे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –

परळीच्या पाणी टंचाईस पंकजाताईच जबाबदार – धनंजय मुंडे

खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर