राज्यातील ‘या’ भागामध्ये महापूर; बचावकार्याला सुरुवात

रत्नागिरी – राज्यातील कोकण भागात पावसाने दणादण उडवली असून ठिकठिकांणी पूर्णपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला आलेल्या पुराणे चांदेराई, टेबेपूल, सोमेश्वर, पोमेंडी गावे बाधित झाली आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर आले असून वाहतूक ठप्प झाली आहे. चांदेराई पुलावरून पाणी वाहत आहे. हरचेरी – चांदेराई मार्गांवर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे.

टेंबेपुल येथील जुन्या पुलावरून पाणी जात आहे. रत्नागिरी शहरात काही ठिकाणी पाणी भरले आहे. चिपळूण, खेर्डीला पुराचा विळखा पडला आहे. पावसाचा जोर असल्याने नद्यांचे पाणी वाढते आहे. मुंबई-गोवा तसेच चिपळूण कराड रोड पाण्याखाली गेला आहे. रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेलेअसून दिसेनासे झाले आहेत.

रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.

समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. गुरुवारी मात्र अस्मानी संकटाने कहर केला. रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला.

चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूर आला आहे. चिपळूण शहराला पाण्याने वेढल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. NDRF च्या २ टीम तातडीने तेथे रवाना करण्यात आल्या आहेत. कोस्टल गार्डला बोटीच्या सहाय्याने मदतीसाठी विनंती केली आहे. जेवणाचे पाकीट तयार केले जात आहेत, पूरग्रस्तांना रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –