३ महिने उलटून फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही

नाशिक जवळील विविध गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. भाजीपाला रोपवाटिकेतून तयार झालेली लागवडीयोग्य रोपे खरेदी करतात. एका रोपवाटिकेतून फ्लॉवरची रोपे खरेदी करून अर्धा एकर लागवड केली. पण,३ महिने लागवडीनंतर कंद तयार न झाल्याने लागवडीसाठी केलेला ५० हजारांचा खर्च वाया गेला.

सुझुकीने सादर केली नवीन Access 125

Loading...

भाजीपाला उत्पादक शेतकरी रुंजा गायधनी यांनी गावातील रोपवाटिकेतून अर्धा एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी सात हजार रोपांची प्रतिरोप ७० पैसे दराने रोपांची खरेदी केली. लागवडीनंतर वेळोवेळी खत पुरवठा, औषध फवारणी करण्यात आली. मात्र, तीन महिने कालावधी उलटून गेल्यानंतरही बनावट रोपांमुळे कंदाची निर्मिती न झाल्याने उत्पादन आलेच नाही.

पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा

त्यामुळे लागवडीपासून त्यांनी केलेला खर्च वाया गेला आहे. पिकासाठी दुसऱ्याकडून पाणी घेतले. मात्र, आता उत्पादन न आल्याने ते अडचणीत सापडले. त्यांनी कंद तयार न झाल्याबाबत खरेदी केलेल्या रोपवाटिकेच्या संचालकांना माहिती दिली. त्यावर संबंधित बियाणे कंपनीचे पाहणी करतील, असे सांगण्यात आले. मात्र, चार दिवस उलटून कुणीही पाहणी केली नाही. तसेच दखल घेतलेली नाही.

Loading...