ता.मावळ – व्हॅलेंटाइन डे चा हंगाम(Season) जवळ आल्यामुळे फुलांच्या किमतीत चांगलीच वाढ(Increase) होत असल्याचे दिसत आहे तसेच एक फेब्रुवारीपासून गुलाबाचे(Rose) फुले मावळ तालुक्यातून बाहेरील देशात पाठवणे सुरु झाले आहे. परंतु फुलांना(Flowers) बाहेरील देशात मोठी मागणी आहे तसेच विक्रमी दर हि मिळत असल्याने फुल उत्पादक स्थानिक बाजारपेठांकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे, मागणी जास्त आहे व पुरवठा कमी असल्या कारणाने यंदाचा हंगाम हा फायदेशीर ठरणार असल्याचे दिसते.
मावळ तालुकात सुमारे २००० एकर क्षेत्रावर गुलाबाच्या(Rose) फुलांचे उत्पादन घेतले जाते.
तसेच लग्नसराई सुरु असल्याने सध्या फुलांना(Flowers) मोठी मागणी आहे. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत दर अधिक मिळत आहे. सध्या पुणे, अहमदाबाद, सुरत, भोपाळ, मुंबई, दिल्ली, जयपूर, लुधियाना, जम्मू-काश्मीर, आदी शहरांत मोठ्या प्रमाणावर फुले जात आहेत.
परदेशात लाल गुलाबाच्या एका फुलाला(Flowers) १३ ते १४ रुपये दर मिळत आहे, तर स्थानिक बाजारपेठेत लाल गुलाबाच्या एका फुलाला(Flowers) १७ ते १८ रुपये तर गुलाबी, नारंगी, पिवळा, पांढरा आदी रंगाच्या गुलाब फुलाला २० ते २१ रुपये दर मिळत आहे.
जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेडगे म्हणाले कि ‘बाहेरील देशात तसेच स्थनिक बाजारात अश्या दोन्ही ठिकाणी फुलांना(Flowers) चांगली मागणी आहे तसेच फुल हि उत्तम दर्जाचे असल्याने दर हि चांगला मिळत आहे त्यामुळे फुल उत्पादकांमध्ये(flower Growers)आनंदी वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार – अजित पवार
- सतर्क राहा! ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता; भार
- साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर; आतापर्यंत १९९.७६ लाख ट
- सावधान! दूधासोबत ‘हे’ पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका
- ………तर महाराष्ट्रातील निम्मे साखर कारखाने बंद झाले असते – नितीन गडक