औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या आवकेत चढउतार

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या आवकेत चढउतार bhaji market

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाजर,भेंडी,फ्लॉवर, कोबी, वांगी व हिरव्या मिरचीच्या आवकेत चढउतार पाहायला मिळाली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ ते ८ फेब्रुवारीदरम्यान फ्लॉवरची आवक चांगलीच कमी अधिक राहिली. किमान ५६ ते कमाल १४२ क्विंटलपर्यंत आवक झालेल्या फ्लॉवरचे दर २०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. पत्ताकोबीची आवक ५५ ते १६३ क्विंटलदरम्यान राहिली. या कोबीला २०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान दर मिळाला.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान ज्वारीच्या आवकेत वाढ

वांग्याची आवक २८ ते ५८ क्विंटलदरम्यान तर दर ४०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान राहिले. ५५ ते १३९ क्विंटलदरम्यान आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान दर मिळाले. गाजराची आवकही १७ ते १३५ क्विंटलदरम्यान कमी अधिक होत राहिली. गाजरांना ६०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले. भेंडीला १३०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान दर मिळाला. भेंडीचे किमान दरही १३०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.