लॉकडाऊन काळात अन्न, नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात राज्यात विक्रम

कौटुंबिक पुरवठापत्रिका/शिधापत्रिका

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

नाशिक – कोविड – १९ चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात व लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने अन्न, धान्य वाटपात विक्रम नोंदविला आहे. एप्रिल महिन्यात ६८ लाख १३ हजार क्विंटल, मे महिन्यात ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले आहे तर १ एप्रिल ते ५ जून पर्यंत ६२ लाख ८४ हजार ४१३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

पीक कर्जाचे वाटप १९ टक्क्यावरच ; खरीप पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही

सामान्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३५ लाख क्विंटल धान्य वितरित केले जाते. मात्र एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३१ लाख ५१ हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे ६८ लक्ष १३ हजार क्विंटल अन्नधान्य वाटप केले आहे. मे आणि जून मध्ये केशरी कार्ड धारकांना देखील अतिरिक्त १ लाख ५० हजार क्विंटल धान्य वाटप जात असल्याने  मे महिन्यात ७६ लक्ष ८३ हजार क्विंटल धान्य वितरित करण्यात आले आहे.

रेशन कार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन उपलब्ध होणार- जयकुमार रावल

कोरोनाच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून योग्य नियोजनाद्वारे राज्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

माजी सैनिकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण नोंदणीसाठी सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

एप्रिल महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ६.६९ कोटी नागरिकांना ३६ लाख ६१ हजार क्विंटल (९५%) धान्य  वितरित करण्यात आले आहे.  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना नियमित धान्य घेतल्यानंतर एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो मोफत तांदूळ देण्यात येत असून सदर योजने अंतर्गत एप्रिल महिन्यात ५ कोटी ९३ लाख (९० टक्के) लाभार्थ्यांना ३१ लाख ५१ हजार ३८० क्विंटल मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले. तर Portability मुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या ३६ लाख ५८ हजार ६९९ लाभार्थ्यांनी एप्रिलमध्ये राज्यात ते जिथे आहेत तिथे धान्य घेतले आहे.

मे महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ६.५८ कोटी नागरिकांना ३६ लाख ९२ हजार ०९० क्विंटल (९० टक्के) धान्य वितरीत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ६ कोटी ०२ लाख लाभार्थ्यांना ३१ लाख ७३ हजार २२० क्विंटल (९१ टक्के) मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले. Portability मुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या १९ लाख ४६ हजार ५३४ स्थलांतरीत लाभार्थ्यांनी राज्यात ते जिथे आहेत तिथे धान्य घेतले आहे.

पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तुरडाळ/चणाडाळ या दोन्हींपैकी एक डाळ प्रत्येक महिन्याला प्रति कार्ड एक किलो देण्यात येत आहे. एप्रिल महिन्याची प्रती कार्ड प्रती महिना एक किलो याप्रमाणे मे महिन्यात तर मे व जून महिन्यात देय असलेली डाळ जून महिन्यामध्ये वाटप करण्यात येत असून सदर योजने अंतर्गत मे मध्ये ९७ हजार ००५ क्विंटल मोफत डाळ वितरण करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केसरी कार्डधारक ३ कोटी ८ लाख लाभार्थ्यांपैकी १ कोटी ५८ लाख (५२ टक्के) नागरिकांनी मे मध्ये ८ लाख १८ हजार क्विंटल धान्य घेतले. यामध्ये प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दरात गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो देण्यात येत आहे.

राज्यात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना माहे मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रति व्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ दिला जात आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी यासाठी ‘प्रहार’चे आज राजभवनावर आंदोलन

कोरोना कालावधीत शिवभोजन थाळीच्या संख्येत ५० हजारांची वाढ करण्यात आल्यामुळे राज्यात आता दररोज ८३८ शिवभोजन केंद्रांमधून दीड लाख शिवभोजन थाळीचे वितरण होत आहे. राज्यात एप्रिल महिन्यात ७७२ केंद्रांमधून २३ लाख ९९ हजार ७३७ शिवभोजन थाळ्या, मे महिन्यात ८३८ केंद्रांमधून ३३ लाख ८४ हजार ०४० शिवभोजन थाळ्या तर जून महिन्यात दि.१ ते ५ जून पर्यंत ८३८ केंद्रांमधून ५ लाख ६३६ शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात शिधापत्रिका धारकांना तब्बल ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता