“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आता गांजा पिकवण्याची देखील परवानगी द्यावी” – खा. प्रताप पाटील चिखलीकर

गांजा

नांदेड – सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप (Shelf in Shop) या पद्धतीने वाईनची (Wine) विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर देगलूर तालुक्यातील येरगी गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांचा मन की बात कार्यक्रम पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhalikar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना चिखलीकर म्हणाले की,‘राज्य सरकारने आता किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली असून हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे नेतेमंडळी सांगत आहेत. जर असे असेल तर आता शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तसेच महसूल वाढीसाठी राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना गांजाचे (Hemp) पिक घेण्याची देखील परवानगी द्यावी. गांजा पिकवण्याची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल’, असे चिखलीकर म्हणाले आहेत.दरम्यान, याच मुद्द्यावरून प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या की,‘सध्या राज्यात अनेक समस्या असून त्या समस्यांकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. परंतु दुसरीकडे किराणा दुकानात वाईन विक्रीला सरकारने परवानगी दिली आहे. यावरून सरकारला केवळ मद्य विक्रीत रस असल्याचे दिसून येते. तरीही जर वेळ मिळालाच तर सरकारने राज्यातील इतर समस्यांकडे देखील लक्ष द्यावे’, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –