जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराच्या आत

कोरोना

पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात आज सलग पाचव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराच्या आत आहे. इतकंच नाही तर नव्या कोरोना बाधितांमध्ये मोठी घट झाली असून शहरात आज केवळ ४९४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबतच, १ हजार ४१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मार्च महिन्यापासून वाढणारा आकडा हा पहिल्यांदाच पाचशेच्या आत आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील १० हजारांच्या खाली आली आहे. तर, अद्यापही कोरोनाच संकट हे पूर्णपणे नष्ट झालं नसल्याने काळजी व खबरदारी घेणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या –