पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात आज सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराच्या आत आहे. शहरात आज ७३९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून १ हजार ५६० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोना बाधितांचा आकडा हा एक हजाराच्या आत असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील १० हजारांच्या खाली आली आहे.
पुण्यात सध्या ८ हजार ८६८ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी १ हजार ३२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, २ हजार २२४ रुग्ण ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. आज ३५ रुग्णांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच, अद्यापही कोरोनाच संकट हे पूर्णपणे नष्ट झालं नसल्याने काळजी व खबरदारी घेणं गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- जिल्ह्यासाठी चांगली बातमी – सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत
- केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!
- ग्राम रक्षक दल अधिक कार्यक्षम बनवून कोरोनामुक्त गाव अभियान राबवा – बाळासाहेब थोरात