या कारणाने चिकनचे भाव कडाडले …

दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी अनेकांनी पोल्ट्रीचा लॉट न घेतल्याने बाजारात आता चिकनचे भाव कडाडले आहेत. पोल्ट्री लिफ्टिंग रेट सध्या १०० ते ११० रुपये झाला आहे.

होलसेल चिकनचे भाव वधारले असल्याने बाजारात किरकोळ किंमत १८० ते २०० रुपये झालेली आहे. मार्केट रेट असेच चढे राहिल्यास पुढील काळात हे भाव आणखी १०-१२ टक्के वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.