सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल आर्थिक मदत देण्यास भाग पाडू

पीक नुकसान

हिंगोली – अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हे खूप अडचणीत आले आहेत. शेतकरी हा कर्ज काढून शेतातील पीक  घेतो आणि त्यानंतर त्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी दुष्काळाने त्याचे सतत नुकसान होत असते. हातातोंडाशी आलेला घास त्याचा हिरावून घेतल्यासारख होत. त्यामध्ये त्याला अपेक्षा असते की सरकारने त्याला आर्थिक मदत करावी. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी रात्री येळेगाव (ता. औंढा नागनाथ) येथील पीक नुकसानीची पाहणी केली.

अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील वसमत, औंढानागनाथ तालुक्यातील सोयाबीन, कपाशी, तूर उडीद, मूग, ऊस, हळद आदी पिकांचे खूप नुकसान झाले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी रविवारी सकाळी शेतचकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. प्रवीण दरेकर यांनी वसमत तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा,  सोमठाणा या गावातील पीक नुकसानीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी नुकसानीबद्दल आर्थिक मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू, असे आश्वासन दिले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. शनिवारी येहळेगाव सोळुंके (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी प्रभु सोळके यांच्या शेतामधील सोयाबीन पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –