वनपट्टेधारक, वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देणार – विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार व महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी द्यावयाची मदत वनपट्टेधारक व वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, सन 2018 च्या खरीप हंगामातून दुष्काळाच्या वेळी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या विनंतीनुसार याच धर्तीवर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मधील अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी झालेल्या वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र समजण्यात यावे व त्यांना अनुदान वाटप करण्यास परवानगी मिळावी असे कळविले आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीनुसार ज्या मंजूर वनपट्टेधारक व प्रलंबित वनपट्टेधारक यांच्या जमिनीवर असलेल्या पिकांचे माहे ऑक्टोबर 2019 मध्ये ‘क्यार’ व महाचक्रिवादळामुळे ज्यांच्या जमिनीवर झालेल्या अवेळी पावसाने शेती नुकसानीसंबंधात पंचनामा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या स्तरावरून संबंधित तहसीलदार यांना निर्देश देण्यात आले होते.  त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण 1513 मंजूर वनपट्टेधारक व 2472 प्रलंबित वनपट्टेधारक यांचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रात जळगाव आणि  विशेषत: विदर्भातील अशा शेतकऱ्यांचे नुकसान विचारात घेऊन याची तातडीने दखल घेऊन राज्यातील सर्व वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे असे सर्व शेतकरी मदतीसाठी पात्र राहतील असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांना शेती पिके नुकसानीचे रू. 8 हजार प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिके (फळबाग) रू. 18 हजार प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही श्री. वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सुभाष देशमुख

कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश

नाशिकमध्ये द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी