कृषीमंत्री भुसे नौटंकी करतात; ‘ही’ धाड पूर्णपणे मॅनेज- माजी कृषीमंत्री

Dadaji-Bhuse-anil-bonde

अमरावती- कृषीमंत्र्यांची धाडसी कारवाई म्हणजे नौटंकी, कृषीमंत्री नाटक नौटंकी करतात, त्याला काहीही अर्थ नाही. ही धाड पूर्णपणे मॅनेज होती असा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यावर केला आहे. कृषीमंत्र्यांना खत नाकारणाऱ्या या व्यवसायीकावर थेट मोका लावण्याची गरज तर वसुलीआड गुणनियंत्रणाचे कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई अपेक्षीत होती. अशी धाडसी कारवाई टाळत केवळ कॅमेरासमोर नौटंकी करण्यातच कृषीमंत्र्यांनी वेळ खर्ची घातल्याचेही डॉ. बोंडे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, एका ठिकाणी धाड टाकल्याने काही फरक पडत नाही, दक्षता अधिकारी काय करतात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असं अनिल बोंडे म्हणाले. तसेच, दादाजी भुसे यांनी बियाणांच्या दुकानात टाकलेली धाड ही पूर्णपणे मॅनेज होती, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

खतांअभावी वाढली शेतकऱ्यांची डोकेदुखी; सरकारचे झोपेचे सोंग

नेमकं प्रकरण काय?

शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले.

खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देतानाच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – दादा भुसे

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री श्री.भुसे यांनी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषिमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.