दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत उद्या विविध विषयांवर मोफत वेबिनार

मुंबई –  दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी विविध विषयांवर मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.

सकाळी 10.00 वाजता डॉ. भावेश भाटिया आदर्श दिव्यांग उद्योजक यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रमुख वक्ते- भावेश भाटिया.

या वेबिनरचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/iFCARXwLpDo या लिंकचा वापर करावा.

दुपारी 1.30 वाजता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार तक्रार निवारण अधिकारी यांची भूमिका  याबाबत माहिती देण्याकरिता ॲड. उदय वारुंजीकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे . या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/mkGuto37nYg या लिंकचा वापर करावा, असे आवाहन दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –