पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार

कोरोना

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता.

याबाबत आरोग्यमंत्री बोलताना म्हणाले कि, व्हॅक्सिन मैत्रींतर्गत भारत संपूर्ण जगाला मदत करणार आहे. तसेच चौथ्या तिमाहीमध्ये कोव्हॅक्समध्ये योगदान देणार आहे. आम्हाला पुढच्या महिन्यात कोरोनाविरोधी लसींचे ३० कोटींहून अधिक डोस मिळण्याची अपेक्षा आहे. लसींचे उत्पादन वाढणार आहे. याचं कारण म्हणजे जैविक ई आणि इतर कंपन्या आपल्या लसी बाजारात आणणार आहेत.

कोव्हॅक्स एक जागतिक पाऊल आहे, त्याला औपचारिकपणे कोविड-१९ लसीची जागतिक पुरवठा सुविधा म्हणून ओळखले जाते. मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोरोनावरील लसीचे डोस वेळेत मिळावे, हे सुनिश्चित करणे हे याचे लक्ष्य आहे. तर देशामध्ये कोरोना विषाणूविरोधातील सुरू असलेल्या लसीकरणाच्या अभियानांतर्गत आतापर्यंत ८१ कोटींहून अधिक व्यक्तींना लसीचे डोस देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले दरम्यान, १० कोटी डोस तर केवळ ११ दिवसांत दिले गेले, अशी माहिती देखील यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –