‘या’ जिल्ह्यात आजपासून किराणा, भाजीपाला – फळविक्री सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंतच सुरु राहणार

भाजीपाला

नांदेड – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. सदर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेवून याबाबत गांभिर्याने निर्णय घेणे अत्यावश्यक झाले.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता सोमवार दिनांक 19 एप्रिल 2021 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने या आस्थापना सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेतच सुरु राहतील. यानंतरच्या वेळेत केवळ घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) साठी मुभा असेल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले आहे.

कोरोना तसेच लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील. तर नांदेड शहरासह जिल्हाभरामध्ये कोरोना रुग्णांचा कहर खुप मोठ्या प्रमामात वाढत चालला आहे. म्हणुनच जिल्हाधिकारी यांनी रविवारी सायंकाळी या बद्दलचे नवीन नियमांमध्ये सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. तर आता या मुळे कोरोनाचा कहर कमी होण्यास मदत होणार आहे, हे लक्षात घेवून ही नवीन वेळ घोषीत करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –