नागपूरच्या विशाल मेगा मार्टमधून बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी सोयाम यांनी विशाल मेगा मार्ट येथे तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले आहे. हा अन्न नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. विशाल मेगा मार्टमध्ये बुरशीयुक्त काजू व खराब शेंगदाण्याची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य शाहीद शरीफ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली होती.

मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत मुदत

शरीफ यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायदा अमलात आला. पण फूड बिझनेस ऑपरेटर या कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. ग्राहकांना असुरक्षित खाद्य पदार्थ विकण्यात येत असल्याचे प्रकरण पुढे आले. शरीफ यांनी स्वत: मेगा स्टोरमध्ये जाऊन पॅकबंद काजू आणि शेंगदाणे खरेदी केले होते. पॅकेटबंद दोन्ही खाद्यपदार्थांना बुरशी लागली होती.

५५१ गावांपैकी ४४८ गावांना मिळाली जमीनमालकी

शरीफ म्हणाले, असुरक्षित खाद्य सामग्रीची विक्री करून मेगा स्टोर ग्राहकांना लुटत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. गेल्यावर्षी एफडीएच्या तपासणीत ३७ नमूने असुरक्षित आढळून आले होते. ७ प्रतिष्ठानांविरुद्ध फौजदारी खटले दाखल केले होते. नियमित तपासणी न करता अधिकारी मोठी घटना होण्याची वाट पाहात आहे का, असा सवाल त्यांनी केला.