गौतमचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात ‘गंभीर’ ट्वीट

टीम महाराष्ट्र देशा – गौतम गंभीर मैदानात ज्या पद्धतीने प्रेक्षकांची मने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून जिंकून घेतो त्याप्रमाणे सोशल मिडीयावरून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून सामजिक प्रश्नावर संवेदनशीलपणे विचार करणाऱ्या अनेकांची मने जिंकून घेतल्याचं पहायला मिळते.गौतमने ट्वीटर च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे देशाचे लक्ष वेधले आहे. पद्ममावती चित्रपटासाठी माध्यमांना भरपूर वेळ आहे. परंतू शेतकऱ्यांची आत्महत्या, सीमेवर हुतात्मा होणाऱ्या जवानांचे प्रश्न त्यांना का महत्वाचे वाटत नाही; असा रोकठोक सवाल त्याने उपस्थित करत सर्वांनाच आत्मचिंतन करायला भाग पाडलं आहे .

देशभरात सध्या पद्ममावती चित्रपटावरून गेल्या काही दिवसापासून मोठा गोंधळ सुरु आहे .सर्वसामान्यांना खर तर या चित्रपटाच्या वादात कोणताही रस नाही मात्र माध्यमांमधून वारंवार चर्चा घडवून आणल्या जात आहेत त्यामुळे देशाचे लक्ष मुलभूत समस्यांपासून दूर गेल्याचं चित्र आहे . नेमका हाच मुद्दा उचलून धरत गौतम गंभीरने अतिशय मार्मिक ट्वीट करत मर्मावर बोट ठेवलं आहे .सध्या हे ट्वीट खूप चर्चेत असून गौतम गंभीरच्या संवेदनशिलतेचं  कौतुक सर्वत्र होत आहे.

गौतम गंभीर म्हणतो

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारीनुसार १९९५ ते २०१५ पर्यंत जवळपास ३२१४२८ शेतकऱ्यांनी आणि शेत मजुरांनी आत्महत्या केल्या आहेत नागरिक तसेच सैनिक असे दोन्ही मिळून लाखो लोक दहशतवादी हल्ल्यात आपण गमावले आहेत आणि आपण पद्मावतीच्या प्रदर्शनाविषयी वादविवाद घालत बसलो आहोत आणि याच्याच बातम्या पहिल्या पानावर अथवा प्राईम टाईम न्यूज मध्ये पहायला मिळत आहेत .