काळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हात  नसून मान लाल होऊन जाते. आज आम्ही आपल्याला सांगू असे काही सोपे उपाय ज्याच्या मदतीने आपण काळी मान स्वच्छ करू शकतात. या वस्तू आपल्या सहजपणे घरात उपलब्ध होऊन जातील. चला तर जाणून घेऊ उपाय……

  1. बेकिंग सोडा – तुम्हाला सांगतो, बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मानेचा काळपटपणा दूर करू शकता. यासाठी, तुम्हाला बेकिंग सोड्यात थोडेसे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करायची आहे. ती तुमच्या मानेवर लावा. थोडा वेळ ठेवा. नंतर, पाण्याने धुवा. हा प्रयोग तुम्ही थोडे थोडे दिवसानी केलात, तर तुम्हाला फरक पडलेला दिसेल.
  2. बटाट्याचा रस – तुमच्या माहितीसाठी सांगतो, कि लिंबाप्रमाणे बटाटा हा सुद्धहा नैसर्गिक ब्लीचचे काम करतो. त्यात असलेले तत्व हे त्वचेचा रंग चमकदार करण्यास मदत करतात. बटाटा सोलून त्याचा रस थोड्या वेळासाठी जर मानेवर लावलात, तर तुम्हाला तुमच्या मानेच्या रंगात नक्कीच फरक जाणवेल.
  3. लिंबू आणि मधाचे मिश्रण – तुम्हाला सांगू इच्छितो, की लिंबू आणि मध यांचे मिश्रण आंघोळीच्या अर्धा तास आधी मानेला लावून ठेवा आणि आंघोळ करताना मान स्वछ धुवून टाका. जर तुम्ही असे केलेत, तर मानेचे काळेपण नाहीसे होईल व सुरकुत्यांची समस्येचे पण निवारण होईल.
  4. कच्चा पपई – तुमच्या माहितीसाठी, कच्चा पपई ही त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतो. तुम्ही पपई वाटून त्यात गुलाबपाणी आणि एक चमचा दही मिसळा. नंतर, तो लेप तुम्ही मानेवर लावा. तुम्हाला हा उपाय फक्त आठवड्यातून एक वेळा करायचा आहे. यामुळे तुमच्या मानेचा काळपटपणा निघून जाईल.

महत्वाच्या बातम्या –