शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार, गिरीश महाजन यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे सरकार विरोधात भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे . शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणणाऱ्या सरकारने आता त्याच शेतकऱ्यांना चिंताग्रस्त केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणणाऱ्या सरकारने आता त्याच शेतकऱ्यांना चिंताग्रस्त केलं आहे. त्यामुळे भाजपकडून सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. तर मराठवाड्याच्या पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी पंकजा मुंडे ह्या उपोषणाला बसल्या होत्या, तर इतर ठिकाणही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी भाजपकडून राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाणार आहे. सरकारने या विषयी त्वरित पावले उचलावीत. अन्यथा भाजपकडून स्थानिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर आंदोलने करावे लागतील असा इशारा महाजन यांनी सरकाराला दिला आहे.