अन्यथा! नरड्यावर पाय ठेवू – राजू शेट्टी

कोल्हापूरः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. साखळी करून साखरेचे भाव पाडणे आणि साखर विकून झाली की भाव वाढवायचे आणि त्यातून नफा कमवायचा. यामध्ये साखरेची साठेबाजी होत असून यासाठी टोळी कार्यरत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

साखरेचे भाव पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून भाव पडल्याने कारखानदारांनी टनामागे पाचशे रुपये कपात केली आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे परस्पर कापून घेण्याचा अधिकार कारखानदारांना कुणी दिला असा प्रश शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. ऊस उत्पादकांचे ठरलेले पैसे येत्या पंधरा दिवसांत दिले नाही तर आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

काय म्हाणाले राजू शेट्टी?

पालकमंत्र्यांनी दर ठरविताना मध्यस्थी केली, आता त्यांनी निस्तरायची जबाबदारीही घ्यावी. येत्या पंधरा दिवसांत कपातीचे पैसे न मिळाल्यास कारखानदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. दोन वर्षांपूर्वी कारखाने एकरकमी एफआरपी देऊ शकत नव्हते. त्या वेळी आम्ही मदतीला धावून गेलो. आता आम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत असाल तर नरड्यावर पाय ठेवून वसुली करू