‘सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाजारातून सामान खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्या’

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 25 ऑक्टोबर रोजी देखील त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या.

मोदींनी आज बोलताना पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचा नारा दिला. मोदी म्हणाले, ”जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारत कधी जायचं काय? खरेदी करायची. विशेषता मुलांमध्या याबद्दल मोठा उत्साह असतो. सणांचे हा उत्साह व बाजारातील चमक एकमेकांशी जुडलेली आहे. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे.”

सणांमध्ये सीमेवर असलेल्या सैनिकांनाही लक्षात ठेवा. प्रत्येक घरात या वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावण्याचे आवाहन मोदी यांनी केले आहे .मोदी म्हणाले, मी, आमच्या वीर जवानांना हे सांगू इच्छितो की, भलेही आपण सीमेवर तैनात आहात, परंतु पूर्ण देश आपल्याबरोबर आहे, आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. ज्यांचे पुत्र आणि कन्या आज सीमांवर तैनात आहेत, त्या कुटुंबाच्या त्यागाला मी नमन करतो, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्हाला नेहमीच आपल्या सर्जनशीलतेने, प्रेमाने, प्रत्येक क्षणी, प्रयत्नपूर्वक, एक भारत श्रेष्ठ भारत, हे तत्व सुंदर रंगात साकार करायचे आहे. काश्मीर खोरे, संपूर्ण देशभरातील, ~90 टक्के पेन्सिल स्लेट, लाकडी पट्टीची मागणी पुरी करते आणि त्यात देखील खूप मोठा भाग पुलवामा चा आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपण विदेशातून पेन्सिली साठी लाकूड मागवत होतो. पण आता आमचा पुलवामा, देशाला आत्मनिर्भर बनवतो आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –