शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे

वर्धा  : नाकर्त्या सरकारने राज्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले परंतु कर्जमाफीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने १ ते १२ डिसेंबरपर्यंत भाजप सरकारच्याविरोधात हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. आज ही पदयात्रा वर्धा जिल्हयातील सालोड-हिरापूर येथे आली आहे. या पदयात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे सहभागी असून सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत आहेत.