कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्या – छगन भुजबळ

छगन भुजबळ

कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे.

शेतीच्या उपसा सिंचन योजनेवरील कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – सुभाष देशमुख

मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम असल्याने अजून  गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न, पुरवठा मंत्री राम विलास  पासवान यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारने घेतला डिंभे धरणाबाबत एक महत्वाचा निर्णय

यासंदर्भात छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोविड – १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केल्याने नागरिकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेवाय) राज्यातील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत सिंचन प्रकल्पांसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा आढावा घेणार – जयंत पाटील

मात्र अद्यापही देशात कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासनाच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया जरी सुरु केलेली असली तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे.

अखेर ब्रम्हगव्हाणचे पाणी दहावर्षांनंतर खेर्डा प्रकल्पाकडे

त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुरु असलेले मोफत धान्य वितरणास जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येऊन राज्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

चांगली बातमी – शेतकऱ्यांना आता सात वर्षानंतर सूक्ष्म सिंचन योजनेचा पुन्हा लाभ

ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजनेवरून सतीश चव्हाण आक्रमक




Loading…