कृषी व सिंचन क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे विकासाला गती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेती आणि कृषीला प्राधान्य देत मागील वर्षात विदर्भासह राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती दिली आहे. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासास‍ह सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दै. तरूण भारतच्या वतीने आयोजित विदर्भ आणि परिसराचा सर्वांगीण विकास’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या समारोपात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे प्रबंध संचालक धनंजय बापटनरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष डॉ. विलास डांगरेमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुहीकर,संपादक गजानन निमदेव उपस्थित होते.यावेळी तरुण भारतच्या नव्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शेती आणि सिंचनावर अधिक लक्ष केंद्रित करीत असतानाच राज्यातील सर्वच क्षेत्रातील अनेक प्रकल्प अवघ्या 4 वर्षात प्रगतीच्या मार्गावर आहेतयाची माहिती दिली. अमरावती येथे सुरू करण्यात आलेला टेक्सटाईल पार्कविदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात देण्यात असलेली सवलतनागरिक-सरकार संबंध आणखी भक्कम करण्यासाठी डिजिटल उपाय आणि पर्यटन विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीसमाजराज्य आणि देशात घडत असलेल्या बदलांवर अशा चर्चासत्रांच्या माध्यमातून मंथन होते. या मंथनातून नक्कीच चांगल्या कल्पना मांडल्या जातात. गेल्या चार- साडेचार वर्षांत विदर्भ आणि राज्य पातळीवर विकासकामे झपाट्याने होत आहेत. विरोधी पक्षात असताना विदर्भातील विविध समस्या मांडायचोत्या समस्यांची यादीच बनवली होती. त्याच्या ब्ल्यू प्रिंटचे काम मोठ्या ताकदीने केले. त्यामुळे आता त्याचे परिणाम विकासाच्या माध्यमातून दिसून येत आहेत.

शेतीउद्योगासह सर्वच क्षेत्रात व्हॅल्यू ॲडेशन करायचे असेल तर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून शाश्वत शेती आणि सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ प्रकल्प सुरु करून चालत नाहीत तर ते पूर्णत्वास नेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगताना राज्य शासनाच्या गेल्या चार-साडेचार वर्षांत  विदर्भासह राज्यातील जुन्या प्रकल्पांना फेरप्रशासकीय मान्यता दिली. ते आता पूर्णत्वास जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या चर्चासत्रात सांगितले.

श्री.गडकरी यांनी केंद्र शासनाकडून भरघोस निधी मिळवून दिला. त्यामुळे विदर्भातील सर्वच11 जिल्ह्यातील अर्धवट पडून असलेल्या प्रकल्पांचे काम सुरु केले. गेल्या वर्षभरात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामधून आता एक लाख हेक्टरवर सिंचन होत असूनभविष्यात त्या सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होईलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात शाश्वत शेतीच्या सिंचनासाठी राज्य शासनाने धडक सिंचन विहीरमागेल त्याला शेततळे आदि योजना सुरु केल्या. त्याशिवाय पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना बोड्यासाठीही निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगून ते म्हणाले की खुल्या कॅनॉलऐवजी आता बंद पंपांमधून शेतीला पाणी नेण्याचे काम सुरु केला असून आहे. शेतीला कमी पाण्यातून जास्त उत्पादन मिळावेयासाठी ठिबक सिंचनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. त्यासाठी शासन त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल पिकवतो. मात्र त्याच्या मालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे आता शेतमालावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले.  विदर्भातील अमरावती येथे गेल्या वीस वर्षात प्रथमच इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क सुरु केला असून कापड आणि फॅशनेबल कपडे असा पक्का माल तयार करुन मार्केटमध्ये आणला जात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तसेच मोर्शी येथे कोका कोलापेप्सीपतंजलीचे काम सुरु करत आहोत. त्यांच्या शीतपेयांमध्ये या भागात पिकणारा संत्रात्यातील पल्प वापरता येणार असल्यामुळे येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल. पूर्वीच्या तुलनेत आता या भागात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढत असून उद्योगांसाठी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशपेक्षाही कमी दरात विजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच खनिकर्म विभागाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असूनमहाराष्ट्रातील सर्वच भागात विकासकामे आणि उद्योगउभारणीवर शासनाचा भर असल्याचे ते म्हणाले.

राज्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात रस्तेराष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्याचे काम वेगाने सुरु असूनगेल्या 70 वर्षांपेक्षा जास्त रस्तेबांधकाम मागील साडेचार वर्षांत अधिक झाल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तसेच विदर्भात पर्यटनाच्या विपुल संधी असूनराज्य शासनाने दक्षिण आफ्रिकेच्या जंगल सफारींचा अभ्यास केला असूनविदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्रप्रकल्प अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे पर्यटन क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलदरा येथील हरीकेन पॉईंटवर स्कॉय वॉक बनविणार असल्याचे सांगितले.

 तसेच या दोन दिवसीय चर्चासत्रात राज्याच्या विकास प्रक्रियेसाठी उपयुक्त अशा नवनवीन संकल्पना तसेच सूचना आल्या असतील. त्यातील चांगल्या संकल्पनांवर राज्य शासनाला काम करता येईल. पूर्वी आाणि गेल्या चार-साडेचार वर्षातील विदर्भात झालेल्या विकासकामांवर राज्य शासन विकासाचे डाक्युमेंट तयार करत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.