वाढत्या महागाईच्या काळात सोलापुरात बोकडांच्या चोरीचे प्रकार उघडकीस

वाढत्या महागाईच्या काळात मटणाचेही दर वाढले आहेत. सोलापुरात बोकडाच्या मटणाचा दर ५५० रुपये ते ६०० रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे मटण खाणे सर्वसामान्य खवय्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.सोलापूरमध्ये बोकडाच्या मटणाचे दर वाढत चालल्यामुळे त्याचा परिणाम शेळी व बोकडांच्या सुरक्षिततेवर होत आहे. बोकडांच्या चोऱ्या होण्याचे प्रकार अलीकडे वाढत चालल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.

पश्चिम वऱ्हाडातिला रेशीम पोहोचले कर्नाटकात

शहर व जिल्हा ग्रामीण भागात एकाच दिवशी बोकडांच्या चोऱ्यांचे दोन प्रकार उघडकीस आले असून त्याची नोंद पोलिसांत झाली आहे. संजय कृष्णा बोराडे यांच्या घरासमोर अंगणात बांधलेल्या तीन शेळ्यांसह तीन बोकड चोरटय़ांनी पळविले. त्याचवेळी शंकर ढेकळे यांच्या घरासमोरील अंगणातूनही चोरटयांनी एक गाभण शेळी चोरून नेली. चोरण्यात आलेल्या शेळ्या व बोकडांची किंमत ४६ हजार रुपये इतकी दर्शविण्यात आली असून या चोऱ्यांचा गुन्हा करकंब पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.

आदिवासी महामंडळाचा 1 कोटी 34 लाख रुपयांचा तांदूळ घोटाळा

त्यासोबतच रविवार पेठेत गुजर वस्तीत राहणाऱ्या अनिता  शिंगे यांच्या मालकीच्या दोन शेळ्या चोरटय़ांनी पळविल्या. बोकडाच्या मटणाची कसर संकरीत कोंबडीच्या मटणावर काढली जात आहे. मटणाच्या वाढत्या दराच्या विरोधात अजून ओरड झालेली नाही. मात्र या परिस्थितीमुळे शेळ्या व बोकड चोरण्याचे प्रमाण वाढले आहे.