नोकरीच्या मागे न लागता शेतीत केला अभिनव प्रकल्प; तरूणाईसाठी प्रेरणादायी

keli lagvad success story

दुष्काळी भागात आधुनिक केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग

कष्ट करण्याची तयारी, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती असल्यास अशक्य असे काहीच नाही. सध्या शेती परवडत नाही असा नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आवाटी (ता. करमाळा) येथील तरूण शेतकऱ्याने केळी पिकाची आधुनिक लागवड करून भरघोस उत्पन घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

उत्तम शेती करून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी केवळ परिश्रम घेऊन चालत नाही. यासाठी शेतात नवनवीन प्रयोग करावे लागतात. या प्रयोगातूनच आपल्यातील सामर्थ्याची अनुभूती आपल्यासह जगतालाही घेता येते. शिवाय यातून मिळालेले यश हे इतर हताश, निराश शेतकऱ्यानाही प्रेरक ठरत असते. तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुंजलेला असतनाही केळी लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे.

आवाटी गाव विविध वैशिष्ट्यांसाठी प्रसिध्द आहे हे सर्वज्ञात आहे. या वैशिष्टयांमध्ये येथील प्रयोगशील शेती व प्रयोगशील शेतकरीही येतात याची जाणीव संबंध तालुक्यातील शेतक-यांना आहे. अशाच खडकाळ व निकस म्हणून ओळखल्या जाणा-या माळरानावर बहार निर्माण करण्याचे काम युवा शेतकरी अशोक गजेंद्र गोडगे यांनी केले आहे.

वडिलोपार्जित आठ एकर शेतीपैकी चार एकर शेती अशोक गोडगे यांच्या वाट्याला आली. दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता त्यांनी प्रशातिशील शेती करण्याचा निर्णय घेतला.

स्वत्तचे भरपूर शेत असणा-या पण नियोजनबध्द शेती न करणा-या शेतक-यांना गोडगे यांच्या कुटुंबीयांच्या कष्टांतून फुलविलेला मळा आदर्शवत असा आहे. ‘कष्ट व नियोजनबध्द शेती केल्यास अशक्य काहीच नाही’ असं ते सांगतात. दहावी पर्यंत शिक्षण पुर्ण केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी पारंपारिक शेतीचे प्रयोग केले.

अशी केली लागवड

सुरुवातीला हरभरा, ज्वारी या पारंपरिक पिकाचे उत्पादन घेतले परंतु शेतामधून जेमतेम उत्पन्न मिळुन सहसा तोटाच सहन करावा लागला. डोक्यावर कर्जाचे बोज व दुष्काळचे सावट असतानाच शेतात बोअर खोदली

मात्र त्यातून पाण्याची सोय झाली नाही. अशा परिस्थितीत डोक्यावर कर्जाचे बोज वाढत असताना केळी लागवडीचा निर्णय घेतला.

सुरुवातीला गोडगे यांनी ३० गुंठे क्षेत्रासाठी कंदर येथून जी ९ जातीची १५०० केळीची रोपे आणली. त्यांनी ट्रॅक्टर ने मशागत करुन ४×६ अंतरावर लागण केली. आधीच दुष्काळी परिस्थिती व पाण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागल्याने त्यांनी पाण्याच्या प्रत्येकाचे थेंबाचे नियोजन केले. पाण्याचा अपव्यय, भांडवल खर्च व मजुरी यामध्ये बचत करण्यासाठी ठिबकचा प्रभावी वापर केला.

सेंद्रिय खतांच्या वापराला प्राधान्य

लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत आणि जमिनीला आवश्यक घटकांची पुर्तता त्यांनी

केली. त्यांनी शेणखत व लेंडीखताच्या १२ ट्रॉल्या लागवडीसाठी वापरल्या.

रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांच्या वापराला त्यांनी प्राधान्य दिले.

योग्य मशागत व नियोजनबध्द काम यामुळे पहिल्याच वेळी उत्तम पिक आले व त्याला भावही चांगला मिळाला. सध्या त्यांचे उत्पन सुरु झाले असुन त्यांना या शेतितून दहा लाखांचे उत्पन्न अपेक्षीत आहे.

कुटुंबीयांची मिळाली साथ

यासाठी त्यांना वडिल गजेंद्र गोडगे, आई धोंडाबाई गोडगे, पत्नी मनिषा गोडगे व सहकारी शफिक शेख यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. कुटुंबाच्या सहकार्यातून हा प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. गोडगे यांचे परिसरातील शेतकरींमधून कौतुक होत आहे.

मनोगत

“शेती उद्योग म्हणजे तोट्यातील उद्योग, केवळ राबणुकीचे पैसे मिळतात असा शेतकऱ्यांचा समज आहे. आणि तो थोड्याप्रमाणात खराही आहे. चाकोरीबध्द पारंपरिक शेती, निसर्गाचे चमत्कारिक बदल, सरकारची धोरणे यामुळे असे होत असले तरी मी या सर्वांचा साकल्याने विचार करून चाकोरी सोडून केळी उत्पादन घेण्याचे ठरविले आणि माझ्या कष्टाचे फळ मिळाले.”

कृषिदुतांकडून कौतुक

ग्रामीण जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत करमाळा तालुक्यातील आवाटी येथे कार्यक्रम अधिकारी डॉ अजोतिकर सर व विशेष तज्ञ डॉ सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यार्थी आकिब मकसूद शेख,कृषी महाविद्यालय पुणे हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी जागरुकतचे व शिक्षणाचे कार्य करत आहे.

कृषीदूत आकिब शेख याने अशोक गोडगे यांच्या शेतात जाऊन केळी लागवडीची माहिती घेतली असुन अनेक शेतकऱ्यांनी या शेतीचा प्रयोग करावा असं आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –