बजेटच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव घसरले…

gold

बजेट येण्यासाठी एक दिवस राहिला असताना आज म्हणजे गुरुवारी सोन्याचे भाव घसरले आहेत. दिल्लीच्या सराफी बाजारात गुरुवारी एका तोळ्यामागे सोन्याच्या भावात 170 रुपयांची घसरण होऊन ते 34,210 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, चांदी 70 रुपयांनी खाली येऊन एका तोळ्यासाठी 38,580 किंमतीवर आलं आहे.

औद्योगिक क्षेत्रांतील विक्री आणि विक्रेतांचा लिलाव कमी झाल्याने चांदीचे भाव घसरले असल्याचं मत विक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार करता न्यूयॉर्कमध्येही सोन्याच्या दरात घसरण झालेली दिसली. सोन्याला प्रति औन्सला 1,413.46 डॉलर तर, चांदीचा प्रति औन्सला 15.26 डॉलरवर हा दर पोहोचला आहे.

सोन्यानं 34 हजार 700 रुपयांचा टप्पा ओलांडला होता.  सोने दराने गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतात सोन्याचा दर 6 डॉलरनं कमी असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलं होतं  येत्या काही दिवसांत सोन्याचा दर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंत बजेटच्या एक दिवस अशीच सोन्याचा दार कमी झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक..! सरकारी नोकरीतील लाखो पदे रिक्त

किसान क्रेडिट कार्डवर मिळणार बिनव्याजी कर्ज
Loading…