सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये होणार भरती, असा करा अर्ज

सरकारी नोकरी

पुणे – सरकारी नोकरी(Government jobs) मिळवणे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी(Good news) समोर आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती होणार असून लवकरात लवकर अर्ज करा.

हेड कॉन्स्टेबल/फायर या पदांची होणार भरती –

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  विज्ञान मधून १२ वी उत्तीर्ण(Passed) असावे.

ह्या पदासाठी वयाची अट लावण्यात आली असून ०४ मार्च २०२२ रोजी १८ ते २३ वर्षे असावे तसेच (SC/ST – ०५ वर्षे सूट आहे) ( OBC साठी ०३ वर्षे सूट असेल )

नोकरी चे ठिकाण हे संपूर्ण भारत असून भारतात कुठेही नोकरी लागू शकते.

अर्जासाठी फी पुढीलप्रमाणे आहे (General/OBC साठी १०० रुपये आहे )   (SC/ST/ExSM साठी फी नसेल)

अर्ज कसा करावा –   तुम्हाला या पदासाठी  cisfrectt.in/ वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ०४ मार्च २०२२ इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या –