नवी दिल्ली – भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 80 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अधिकृत वेबसाइट- indiancoastguard.gov.in वर विविध गट C नागरी पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या पदांसाठी होणार भरती
रिक्त पदांमध्ये इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायरमन, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), ICE फिटर, स्टोअर कीपर ग्रेड II, स्प्रे पेंटर, एमटी फिटर/एमटी टेक/एमटी टेकजी, एमटीएस माळी, एमटीएस शिपाई, एमटीएस दफ्तरी, एमटीएस स्वीपर, शीट मेटल वर्कर (सेमी-कुशल), इलेक्ट्रिकल फिटर (सेमी-कुशल) आणि मजूर या पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.
पदांची संख्या-
इंजिन ड्रायव्हर – ८ , सारंग लस्कर – ३ , स्टोअर कीपर ग्रेड II – 4 , मोटार वाहतूक चालक – २४ , फायरमन – ६ , ICE फिटर (कुशल) – 6 ,स्प्रे पेंटर – १ , एमटी फिटर/ एमटी टेक/ एमटी मेक – 6
एमटीएस (माली) – ३, MTS (शिपाई) -10 , एमटीएस (डाफ्टरी) – ३ , एमटीएस (स्वीपर) – ३ , शीट मेटल वर्कर (अर्ध-कुशल) – १ ,इलेक्ट्रिकल फिटर (अर्ध-कुशल) – १ , मजूर – १
शैक्षणिक पात्रता:
इंजिन ड्रायव्हर – 10वी उत्तीर्ण आणि प्रमाणपत्र
सारंग लस्कर – 10वी उत्तीर्ण आणि प्रमाणपत्र
स्टोअरकीपर – 12वी उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा अनुभव
मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 10वी उत्तीर्ण आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स. 2 वर्षांचा अनुभव.
फायरमन – 10वी उत्तीर्ण
ICE फिटर (कुशल) – 10वी उत्तीर्ण आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले किंवा ITI किंवा 4 वर्षांचा अनुभव
स्प्रे पेंटर – 10वी उत्तीर्ण आणि प्रशिक्षण पूर्ण केले
एमटी फिटर / एमटी टेक / एमटी मेक – 10वी उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा अनुभव
MTS – 10वी उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा अनुभव
शीट मेटल वर्कर (अर्ध-कुशल) – 10वी उत्तीर्ण किंवा ITI आणि 3 वर्षांचा अनुभव
इलेक्ट्रिकल फिटर (अर्ध-कुशल) – 10वी उत्तीर्ण किंवा ITI आणि 3 वर्षांचा अनुभव
मजूर – 10वी उत्तीर्ण किंवा ITI आणि 3 वर्षांचा अनुभव
कोस्ट गार्ड ग्रुप सी भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?
पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 22 जानेवारी ते 20 फेब्रुवारी इतकी आहे. उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. द कमिशनर कोस्ट गार्ड पूर्व विभाग नेपियर ब्रीज फोर्ट सेंट जॉर्ज, चेन्नई 600009 या ठिकाणी अर्ज पाठवावे लागतील.
महत्वाच्या बातम्या –
- Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार?
- राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार; हवामान खात्याचा अंदाज
- खुशखबर! आता मजुरांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, कसा करावा अर्ज जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….
- धुळीचे वादळ म्हणजे काय ? ‘घ्या’ जाणून सविस्तर.
- राज्यात 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार; मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता
- कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द