पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्याकडची नाणी विकून होऊ शकता लखपती

नाणी

‘जुनं ते सोनं’ ही म्हण जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल. पण जेव्हा भारतात नोटबंदी करण्यात आली तेव्हा मात्र सगळ्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या. यावेळी 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी करण्यात आली होती. पण आता सध्या नाण्यांची किंमत चांगलीच वाढली आहे. जर तुमच्याकडेही काही जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची तुमच्याकडे मोठी आहे.

कारण 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची ऑनलाईन विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. इंडियामार्टच्या वेबसाईवर या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांच्या किंमतीवर विकत घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर या वेबसाईवरून तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. पण या नाण्यांची नेमकी कशी विक्री करायची, चला तर बघुयात….

जेव्हापासून जगात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना अजूनही पगार मिळाले नाहीत. अशात बक्कळ पैसे कमवण्याची ही चांगली संधी आहे. खरंतर, लाख रुपये कमवण्यासाठी बराच वेळ लागतो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा मार्ग सांगणार आहोत.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ती नाणी आहेत, ज्यांच्यावर वैष्णव देवीचा फोटो छापण्यात आला आहे. या नाण्यांना 2002 मध्ये छापण्यात आलं होतं. देवीचे फोटो हे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर छापण्यात आलेलं आहेत. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे.

या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक तब्बल 10 लाख रुपये देण्यासाठी तयार झाले आहे. खरंतर, हल्ली अशी नाणी मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची मोठ्या प्रमाणात किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत.

जगभरात अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. इंडियामार्टवर अनेक लोक अशा जुन्या वस्तूंच्या शोधात येत असतात. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची संधी घालवू नका.

महत्वाच्या बातम्या –