गोंदिया, नागपूर, वर्धामध्ये पावसाने लावली हजेरी

पावसाने लावली हजेरी

ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली असून राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तसेच धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दोन आठवड्यापासून थंडी कमी झाली आहे. अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पाचा पुरवठा होते असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात हलक्या पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागातर्फे गोंदिया येथे १ मिलिमीटर, नागपूर येथे ०.३ तर वर्धा येथे ०.४ मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यात ढगाळ हवामान आहे.

महत्वाच्या बातम्या –

नागपूर, मुंबई आणि डहाणूमध्ये पाऊस, मुंबईतील किमान तापमान १३ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता

म्हशीला रेबीज झाला म्हणून संपूर्ण गाव गेलं दवाखान्यात

शासकीय कापूस खरेदी दहा दिवसापासून बंद

मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत अतिवृष्टी – हवामान खाते