शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ४८ तासात मॉन्सून दाखल

वायू नावाच्या चक्रीवादळाने मुंबई व कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरातमध्ये अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर, मॉन्सूनही आता वेगाने पुढे सरकू लागला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजाने पुढील ४८ तासात म्हणजेच उद्यापर्यंत (रविवार) मॉन्सून कधीही राज्यासह गोव्यात दाखल होऊ शकतो. मान्सूनपूर्व पाऊस काही ठिकाणी झाल्याने शेतकरी आनंदात आहेत. अशावेळी मॉन्सूनच्या पावसाची जोड त्याला मिळावी व जिथे आतापर्यंत पाऊस झाला नाही तिथेही दमदार पाऊस व्हावा, अशीच अपेक्षा राज्यातील सर्वांना आहे.