शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; आता राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरणासाठी देणार अनुदान, त्यामुळे लवकर करा अर्ज

कृषी यांत्रिकीकरण

शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात. देशातील जवळ-जवळ ७० टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे.

शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम “सुपीक” जमीन आणि नंतर “पाणी” लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे “मनुष्यबळ”. हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा “पैसा” (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती “बाजार पेठ”. शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.

शेती करताना आता या शेती व्यवसायात आधुनिकीकरण व यांत्रिकीकरण वापरने गरजेचे आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे जीवन व पर्यायी शेतीची कामे यंत्राच्या साह्याने होत आहे. तसेच यंत्रामुळे कामे होत असल्याने शेतकऱ्याला कामासाठी कमी मजुर लागत आहेत आणि त्याचा वेळ देखील जास्त खर्च होत नाही. तसेच यामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणतआहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत आहे आणि त्याला खूप मदत होत आहे.

आता शेतकऱ्यांसाठी त्यामधीलच एक योजना म्हणजे शेतीकामासाठी लागणाऱ्या यंत्रांवर देण्यात येणारी अनुदान योजना. आता शेतकऱ्यांना राज्य सरकार कृषी यांत्रीकीकरणावर अनुदान देणार आहे. शासनाने सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांना शेतामध्ये लागणाऱ्या विविध प्रकारच्या यंत्रांसाठी लागू आहे. त्यामध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रोलिक पलटी नांगर, ऊस पाचट, कडबा कुट्टी यंत्र, पावर टिलर, विडर मशीन, फवारणी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॅक्‍टरचलित विविध प्रकारच्या अवजारांसाठी ही योजना लागू आहे. तसेच आता शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शेताचा सातबारा उतारा व आठ अ चा उतारा, शेतकऱ्याचे आधार कार्ड( ज्याच्या नावे सातबारा असेल त्याचे कार्ड), बँकेचे पासबुक, ट्रॅक्टर अनुदान घ्यायचे असेल तर ट्रॅक्टरचे आरसी बुक, आवश्यक असल्यास कास्ट सर्टिफिकेट या सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळालेली पावती सांभाळून ठेवावी.

या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा

ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र, फवारणी यंत्र तसेच पॉवर टिलर, वीडर, रिपर कापणी यंत्र, खरेदी करायचे असतील त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. यासाठी सातबारा व ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, ट्रॅक्टर आर. सी. बुक, जातीचा दाखला या कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणी करावी.

महत्वाच्या बातम्या –