शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; आता शेतमालाच्या विक्रीसाठी वापरा अॅग्रीबाजार अॅप..!

शेतमाल

मुंबई – भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. भारतातील ६५% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. यावरून भारतातील शेतीचे महत्व लक्षात येते. शेती क्षेत्रात उत्पादित केलेल्या मालावर  प्रक्रिया करणारे विविध छोटे व मोठे उद्योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांना लागणार कच्चा माल हा शेतीतून पुरवला जातो.पण हा संपूर्ण शेतमाल उद्योगांनाच जातो अस नाही. शेतकरी हा शेतमाल विकण्यासाठी अनेक वेळा धडपड करत असतात. पण आता त्यांना धडपड करण्याची गरज नाही कारण शेतमालाच्या ऑनलाईन विक्रीसाठी आता अॅग्रीबाजार अॅप आहे आणि ते आता शेतकरी वापरू शकतात.

पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक

तसेच कोरोनाचा काळ हा शेतकऱ्यांसाठी खूप कठीण आहे. त्यामध्ये भारतातील पहिली खासगी इलेक्ट्रॉनिक अॅग्रीमंडी असलेल्या अॅग्रीबाजार अॅपने  या काळात भारतातील लहान शेत-मालकांच्या प्रतिसादात प्रचंड (४००%) वाढ अनुभवली. तसेच हे अॅप शेतक-यांना फोन बटणच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची सविस्तर माहिती अपलोड करून देईल.त्याचप्रमाणे प्रत्यक्ष खरेदी करणा-यांपर्यंत ती पोहोचवण्यास मदत करते. लहान शेतक-यांचे समाधान होण्याकरिता प्लॅटफॉर्मवर खरेदीदार व विक्रेता यांमध्ये थेट वाटाघाटी करून पारदर्शकता पुरवली जाते.

सहकारी साखर कारखान्यांना बँक गॅरंटी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न सुरु

तसेच अॅग्रीबाजारचे सहसंस्थापक आणि सीईओ अमित अग्रवाल म्हणाले, “कोरोनाचा हा काळा हा भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक कसोटीचा तसेच डोळे उघडणारा काळ ठरला. लहान शेतमालकांना त्यांचे उत्पादन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत योग्यरितीने आणि अधिक वेगाने विक्री करण्यासाठी हे अॅग्री टेक प्लॅटफॉर्म मदत करू शकतात, हे यातून स्पष्ट झाले आहे. आमच्या ई मंडी अॅपवर प्रचंड प्रतिसाद नोंदवला गेला असून भारतीय शेतक-यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेला याचा स्वीकार, हे आमच्यासाठीही आश्चर्यकारक आहे.”

महत्वाच्या बातम्या –

चिक्कू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, आवडीने पुन्हा पुन्हा चिक्कू खाल!

वैज्ञानिकांनी ऊसामध्ये लागणार्‍या किडीसोबतच दिली ‘ह्या’ गोष्टींची माहिती
Loading…