मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच कुठल्या नी कुठल्या योजनाघेऊन येते. त्यातच एक नवीन म्हणजे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने खूप मोठं पाऊल उचललं आहे. मोदी सरकार आता देशभरात 10 हजार 845 माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणार आहे. कारण त्याचा शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत करताना योग्य प्रकारे खतं वापरू शकेल. त्यामुळे शेतकऱ्याचा रासायनिक खतांवरचा खर्च हा कमी करून उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी या प्रयोगशाळांना दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची घेणार हजेरी
तसेच या प्रयोगामुळे शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा वापर हा कमी होईल. तसेच यामुळे शेतकऱ्यानां जो मशागतीसाठीचा खर्च लागतो तो ही कमी होही आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनही वाढणार आहे. शेतीचं उत्पन्न विषमुक्त होण्यालाही यामुळे मदत होणार आहे. सध्याची परिस्थीतीमध्ये या प्रयोगशाळा खूप कमी आहेत. तसेच जेव्हा पासून मोदी सरकार आले आहे तेव्हा पासून शेतीकडे मोठ्याप्रमाणावर लक्ष दिल्या जात आहे.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम
तसेच देशातील ह्या प्रयोग शाळा आपल्याला पुरेश्या नाहीत त्यामुळे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या म्हणण्यानुसार 10 हजार 845 प्रयोगशाळांना मंजूरी देण्यात आली आहे. तसेच ते म्हणाले की, मृदा स्वास्थ कार्ड योजनेवर 2014 पासून 2020 पर्यंतचे बजेट हे 1122 कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या –
कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे “ट्विटर मिशन”
हे सरकार शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढणार – उद्धव ठाकरे