शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तूर डाळीच्या दरात झाली तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

तूर डाळी

पुणे –  यावर्षी राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. तर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. तर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतातील तुरीच्या डाळीच्या (Tur dal) पिकाला मोठा फटका बसला आहे या पावसामुळे तुरीच्या पिकाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते शिवाय यामुळे आता सामान्य नागरिक देखील संकटात सापडताना दिसत आहेत.  खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याचे दिसत आहे. यामुळे डाळीच्या दरात चढ-उतार कायम होता. यं. त्यामुळे जवळपास सर्वच डाळींचे भाव वाढताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील अनेक भागातील शेतातील बसल्यामुळे तूर (Tur)  डाळीचे दरात वाढ झालीआहे.

जगातील तब्बल 85% तूर उत्पादन भारतात होते. भारतात कडधान्य पिकांपैकी हरभऱ्यानंतर सर्वाधिक तूर शेती केली जाते. भारतात तूर (Tur)  डाळीची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात इत्यादी राज्यांमध्ये केली जाते. कडधान्य पीक असल्याने जमिनीची सुपीकताही वाढते.

दरम्यान, शेतातील तुरीच्या (Tur) पिकाला मोठा फटका बसला असला तरी तूर उत्पादनात मोठी घट झाली असली तरी ही घसरण शेतकऱ्यांसाठी आशादायक ठरत आहे. वास्तविक, तूर डाळीच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्रात तूर डाळीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे की  मागील काही दिवसापाहिले तूर डाळीचा भाव 6 हजार रुपयांपेक्षा कमी होता, तर आता मागील आठवड्यापासून  या दरात मोठी वाढ झाली असून आता तूर डाळीच्या भावात तब्बल 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर आता तूर डाळीचे  भाव 5 हजार 800 वरून तब्बल 6 हजार 500 रुपयांवर पोहोचली आहे.

तर राज्यातील अकोला, लातूर आणि अमरावती या जिल्ह्यांमधील बाजारपेठेतही तूर डाळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या –