ऊस उत्पादकांसाठी चांगली बातमी! निफाड, रानवड येथील साखर कारखाने होणार सुरू

ऊस उत्पादक

नाशिक – ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ, साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस हे वार्षिक पीक आहे. उसाच्या पेरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन रोप लावतात. उसाला काळी कसदार जमीन लागते, कारण उसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत.ऊसा पासून मोठया प्रमाणात साखराचे उत्त्पादन घेतले जाते .

हिरवे वाटाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ऊस उत्पादकांना त्यांचा सगळा ऊस हा कारखान्यावर द्यावा लागतो. निफाड तालुक्यातील रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना आणि भाऊसाहेबनगर येथील निफाड सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे. हे कारखाने बंद असल्यामुळे ऊस उत्पादकांसमोर अडचणी होत्या.  मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस

दोन्ही साखर कारखाने आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती व स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून या दोन्ही सहकारी संस्थांना कारखाने कसे भाडेतत्वावर चालविण्यास घेता येतील याकरिता प्रयत्न सुरू होते. मात्र निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून परवानगी घेणे गरजेचे होते.

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

या संस्थांना शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून परवानगी देणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने या दोन्ही संस्थांनी प्रस्ताव शासनाकडे दाखल केले होते. त्याला अनुमती देण्यास आल्याने या बैठकीत यश मिळाले आहे. शरद पवार यांच्या सूचनेनुसार बुधवार म्हणजेच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –

देशातल्या 5 बँकांत मोठी भरती, अर्ज करून मिळवा नोकरी

कडू कारल्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या