जिल्ह्यासाठी चांगली बातमी – सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत

कोरोना

पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात आज सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांचा आकडा हा १ हजाराच्या आत म्हणजेच तीन अंकी आहे. पुणे शहरात आज नव्याने ८४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ हजार ९४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ४० नागरिकांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या (ऍक्टिव्ह रुग्ण) १२ हजार ३३० इतकी आहे. यापैकी १,३०९ रुग्ण गंभीर तर ४, १३१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –