जिल्ह्यासाठी चांगली बातमी – गेल्या २४ तासांत तब्ब्ल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

ओमायक्रॉन

लातूर – कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी आता त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लातूरकरांना जरासा दिलासा मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या देखील गेल्या महिन्यापेक्षा कमी होत आहे. रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी अजून कोरोनाचे संकट गलेल नाहीये, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे देखील काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन येथील स्थानिक प्रशासन करत आहे.

गेल्या चोवीस तासांत ३४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू पावले. जिल्ह्यात आतापर्यंत १८०२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दगावले आहेत. मागच्या पाच दिवसांत १६८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी आरटीपीसीआर एकूण टेस्ट १२१३ तर रॅपिड अँटिजेन टेस्ट १९०१ झाल्या. अशा एकूण ३११४ टेस्टमधून ४२६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण समोर आले. आरटीपीसीआर टेस्टमध्ये २४६ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये १८० असे मिळून ४२६ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.

गेल्या चोवीस तासांत ८३४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दुरूस्त होऊन आपापल्या घरी गेले. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजार २९१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असून, यातील ७६ हजार २०८ रूग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या रूग्णालयात उपचार घेणारे १९६४ रूग्ण असून, कोवीड सेंटरमध्ये ८७४ रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूचा दर खाली येण्याची गरज आहे. दगावणाऱ्या रूग्णांचा आकडा तीसच्या पुढेच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –