पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात आज नव्याने ९३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६३ हजार १०३ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार ०७६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४० हजार १७३ झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात १२ हजार २२६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ०४ हजार ३२४ इतकी झाली आहे.
दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १५ हजार ०४३ रुग्णांपैकी १,३२८ रुग्ण गंभीर तर ४,३६० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ८८७ इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- निवडलेली अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार – दादाजी भुसे
- चांगली बातमी – राज्याच्या रिकव्हरी रेट झाली मोठी वाढ; दिवसभरात तब्ब्ल ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त
- ‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक
- ‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या