राज्यासाठी चांगली बातमी: एकाच दिवसात ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोना

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे.

दरम्यान, . राज्यात गेल्या २४ तासांत २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७ लाख १३ हजार २१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.४६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू मागील ४८ तासातील तर १५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यात २ लाख ७६ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४६ लाख ८ हजार ९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख १३ हजार २१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २० लाख ५३ हजार ३२९ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १४ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महत्वाच्या बातम्या –