रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी – रेल्वेची ‘ही’ सेवा पुन्हा सुरु होणार

रेल्वे

नवी दिल्ली : जगातील ५ व्या क्रमांकाची सर्वात मोठी सेवा देणारी रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वे (Railways) . भारतीय रेल्वे भारतात एकूण ६५,५२५ किमी साठी सेवा देते. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात ५ वी मोठी रेल्वे आहे. देशभरात अनेक प्रवासी लाखोंच्या संख्येने रोज रेल्वेने प्रवास करीत असतात, याच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आता एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पूर्णतः बंद केली गेलेली खाद्य सेवा भारतीय रेल्वे १४ फेब्रुवारी पासून पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरु करणार आहे. भारतीय रेल्वेतील खाद्य सेवा आयआरसीटीद्वारेच प्रवाश्यांना पुरवली जाते. मात्र २०२० मध्ये भारत देशात कोरोनाने आपले हात पाय पसरवायला सुरुवात केल्यानंतर खबदादरीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वे द्वारा ही खाद्यसेवा बंद करण्यात आली होती.

मात्र आता देशभरात जस जसे कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे तस तशी रेल्वे कडून पुरवली जाणारी खाद्य सेवा हळू हळू पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आतापर्यन्त देशातील ८० टक्के रेल्वे मध्ये खाद्यसेवा कोविड नंतर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तर उर्वरित २० टक्के रेल्वे मध्ये पण ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे ही खाद्य सेवा पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरु करत असल्यामुळे अनेक प्रवाश्यांना गरम आणि दर्जेदार जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –