मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
काल राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील कोरोना रुग्ण्संखेत झाली मोठी घट; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 एक लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूर
- ‘या’ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट!
- आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
- ‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश – अजित पवार यांची माहिती