खुशखबर! आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 जागांसाठी मेगाभरती, ‘असा’ करा अर्ज

जॉब्स

मुंबई – कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात मागील वर्षापासून भरती निघाली आहे. त्यातच आता महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 जागांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. त्यामुळे इछुक उमेदवारानी या पदासाठी काम करण्यासाठी चांगली संधी ठरू शकते.

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये गट-ड च्या जागांसाठी ही भरती असणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे. तर 09 ऑगस्ट 2021 पासून अर्ज करण्याची प्रकिया सुरू होणार आहे. या पदभरतीसाठी https://www.arogyabharti2021.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि आधिक माहिती जाणून घेऊ शकता.

ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर हे या नोकरीचं ठिकाण असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –