खुशखबर ; विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात

विनाअनुदानित सिलिंडर

एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली असल्यानं विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरचे दर प्रति सिंलेडर ६२ रुपये ५० पैशांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली. त्यामुळे आता १४ पूर्णांक २ दशांश किलोच्या सिंलेडरसाठी ५७४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.

याआधी गेल्या महिन्यात या सिंलेडरच्या दरात १०० रुपये ५० पैशांची कपात झाली होती, त्यामुळे या दोन महिन्यात विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरच्या दरात एकूण १६३ रुपयांची घट झाली असल्याचं, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या निवेदनात म्हटलं आहे.

1 जुलैपासून हे गॅस सिलिंडरचे हे नवे दर लागू करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबूत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी 14.2 किलो किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडरमध्येच ही दरकपात केली आहे.

अनुदानित सिलेंडरची खरेदी करताना बाजारमूल्याप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा झाल्यास प्रत्येक सिलेंडरसाठी 142.65 रुपये अनुदान मिळेल. आता ग्राहकांना नव्या दरानुसार सिलिंडर मिळणार आहे. वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात.

महत्वाच्या बातम्या –

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवर 5,400 कोटींचा खर्च

जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने जगबुडी पूल बंद

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.